अलीकडच्या काळातील महत्त्वाचे पुरस्कार
१) साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल | सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना देण्यात आला. |
२) अखिल भारतीय साहित्य संमेलन सन्मानचिन्ह | सासवड पुणे येथे ३ ते ५ जानेवारी २०१४ दरम्यान भरलेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘लोकवाङ् मय गृह’ प्रकाशनाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. साहित्य संमेलनात प्रकाशनाचा सत्कार करण्याच्या या नवीन प्रथेच्या पहिल्याच वर्षाचा पुरस्कार लोकवाङ् मय गृहाचे प्रकाश विश्वासराव यांना देऊन गौरवण्यात आले. |
३) वाचणा-याची रोजनिशी / सतीश काळसेकर: | साहित्य अकादमी पुरस्कार २०१३ |
४) डाकीण / संध्या नरे-पवार: | अंजनाबाई इंगळे तिरगावकर स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फांऊडेशन पुरस्कार |
५) आगळ / महेंद्र कदम : | बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार |
६) दलित कविता आणि प्रतिमा / महेंद्र भवरे : | विभावरी पाटील वाङ् मय पुरस्कार |
७) तळ ढवळताना / लहू कानडे: | लक्षणीय पद्य साहित्यकृती पुरस्कार (आपटे वाचन मंदिर), मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार |
८) विश्वाचे आर्त / अतुल देऊळगावकर: | लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार (आपटे वाचन मंदिर) |
९) आमच जगणं आमच लिहिणं / नीला चांदोरकर: | मराठी भाषेतील उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार (आपटे वाचन मंदिर) |
१०) चित्रव्यूह / अरुण खोपकर: | शामराव भिडे ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार (आपटे वाचन मंदिर) |
११) धूसर झालं नसतं गावं / रवी कोरडे: | साहित्य अकादमी २०१३ युवा पुरस्कार, संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार (दाते स्मृती संस्थान), विशाखा काव्य पुरस्कार. |
१२) उच्च शिक्षण : ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे / द. ना. धनागरे: | श्री. मा. चापेकर ग्रंथ पारितोषिक (महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था) |
१३) एरवी हा जाळ / विश्वाचे आर्त / आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान: | महाराष्ट्र राज्य शासन उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार |
१४) एरवी हा जाळ / अभय दाणी : | कवियित्री संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार, मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, कविवर्य वसंत सावंत स्मृती उगवाई पुरस्कार, कै. राघवेंद्र व सुशीलाताई दिवाण स्मृती पुरस्कार |
१५) पडझड / अशोक पवार : | महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार |
१६) माझ्या मना बन दगड / रामचंद्र नलावडे: | शब्दवेल साहित्य पुरस्कार |
१७) कुरण / रामचंद्र नलावडे : | ख्रिस्ती साहित्य प्रसारक मंडळाचा (पुणे) पुरस्कार |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |