२०१२ मधील प्रकाशित पुस्तके येथे क्लिक करा .

२०१३ - २०१४ मधील प्रकाशित पुस्तके येथे क्लिक करा .


२०१५ मधील प्रकाशित पुस्तके


दण्डकारण्य भुई भुई ठाव दे जी.डी. बापू लाड : आत्मकथन एक संघर्ष यात्रा जगण्याची गाथा
लेखक : प्रतिमा जोशी लेखक : पसीताराम सावंत लेखक : जी. डी. बापू लाड लेखक : मोहन कुंभार
पाने : १४८ किंमत : रु. २०० पाने : २६० किंमत : रु. २७५ पाने : २०८ किंमत : रु. ३०० पाने : ९६ किंमत : रु. १४०
आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाला धोका, विश्वासघात व हिंसा यांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढावा लागतो. या व्यूहांमध्ये माणसे गारद होतात, निराश होतात, पण तरीही त्यांचा झगडा त्यांच्याही नकळत चिवटपणे चालूच राहतो. अशा माणसांच्या कथा. परंपरा व नवता यांचा सुरेख संगम या कादंबरीत दिसून येतो. तरल हृदयस्पर्शी व अस्सल अनुभूती. रसरशीत भाषिक सौंदर्य. नव्याने भूमिहीन झालेल्या उद्ध्वस्त शेतकरी कुटुंबाची काळीज हेलावून टाकणारी गोष्ट. ग्रामीण, नागरी, प्रादेशिक अशा सर्व चौकटी भेदून पुढे जाणारी ही कादंबरी वाचकांना समृद्ध बनवते. थोर क्रांतिकारक जी. डी. बापू लाड यांनी केलेल्या विविध घटनांच्या वर्णनामुळे त्यावेळच्या सामाजिक-राजकीय लढ्यांवर प्रकाश पडतो. एका थोर लढाऊ सेनापतीचे आत्मचरित्र म्हणून याचे महत्त्व फार मोठे आहे. जे तरुण हे आत्मचरित्र वाचतील त्यांच्या मनामनात अंगार पेटल्याशिवाय राहणार नाही. जागतिकीकरणाने प्रभावित काळाचे दृश्य स्वरूपाबरोबरच मानवी आंतरिकतेवरही आघात होत आहेत. हा कालबदलातील दुभंग, पेच मोहन कुंभार यांच्या कवितेत मध्यवर्ती आहे. मनुष्य व निसर्गजीवनातला अस्वस्थ कालस्वर ‘जगण्याची गाथा’ मधून व्यक्त झालेला आहे. ‘आरंभ मालिके’तील चौथा कवितासंग्रह.
धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह जिहाद गुलाल आणि सारीपाट पायपीट भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म
लेखक : परावसाहेब कसबे लेखक : वसंत पळशीकर / संपादन : किशोर बेडकिहाळ लेखक : सतीश काळसेकर लेखक : प्रा. राम बापट / संपादक : डॉ. अशोक चौसाळकर
पाने : ५०० किंमत : रु. ५०० पाने : ३३२ किंमत : रु. ३५० पाने : २३६ किंमत : रु. २५० पाने : २७२ किंमत : रु. ३२५
‘धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह’ हा ग्रंथ विविध ज्ञानशाखांच्या आधारे मानवी विकासक्रम स्पष्ट करून, या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. हा ग्रंथ आजच्या मूलतत्त्ववादाने आणि दहशतवादाने भयभीत झालेल्या मानवजातीस स्वत:चे जगणे सुंदर करण्यासाठी एक नवी दृष्टी देईल. वसंत पळशीकरांची या संग्रहातून व्यक्त झालेली िहंदू-मुस्लीम जातीयवादाची चिकित्सा तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. मुस्लीम प्रश्नांच्या मराठी चर्चाविश्वातील हमीद दलवाई - अ. भि. शहा - नरहर कुरुंदकर यांच्या मुख्य धारणेपेक्षा वेगळी चिकित्सा करून वसंत पळशीकरांनी मराठी विचारविश्वात अमूल्य योगदान केले आहे ‘वाचणा-याची रोजनिशी’ या वाचकप्रिय ठरलेल्या गद्यलेखनानंतरचे, कवी सतीश काळसेकर यांनी गेली पन्नासहून अधिक वर्षं देशात केलेल्या भ्रमंतीच्या अनुभवावर आधारित असलेले नवे पुस्तक. मराठी साहित्यात प्रचलित असलेल्या प्रवासवर्णनांपेक्षा काहीसे निराळे प्रवासवर्णन. प्रस्तुत पुस्तकात प्रा. राम बापट यांनी माकस आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या अनुरोधाने समकालीन प्रश्नांची चिकित्सा केली आहे. कालचे आणि आजचे भारतीय राजकारण चांगल्या प्रकारे समजावून घ्यायला ही चिकित्सा उपयोगी ठरेल. प्रा. राम बापट यांच्या लेखनाचा तिसरा खंड.
मम म्हणा फक्त कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य मराठीतील स्त्रियांची कविता मधल्या मध्ये
लेखक : वीरधवल परब लेखक : अर्जुन डांगळे लेखक / कवी : प्रभा गणोरकर लेखक / कवी : गणेश वसईकर
पाने : ११२ किंमत : रु. १५० पाने : १८८ किंमत : रु. २२० पाने : २६८ किंमत : रु. ३२० पाने : ८८ किंमत : रु. १२०
खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य यांतली भेदरेषा पूर्णत: मिटवून त्यातून एकरस वर्तमान निर्माण होण्याची अद्भुत किमया या कवितेत घडली आहे. वाद-प्रतिवाद आणि अंतत: संवादाला सामोरी होणारी ही कविता या काळात खूप गरजेची आणि महत्त्वपूर्ण आहे. माझ्या समीक्षात्मक लेखनात नितळपणा जपण्याचा मी प्रयत्न करतो. माझी सावली त्या लिखाणावर पडणार नाही किंवा दुस-याची सावली त्याच्यावर पडणार नाही याची मी दक्षता घेतो. आणि मला ते शक्य होते कारण मी कोणत्याही साहित्यिक कंपूत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व हाच माझा विचार कंपू होय. - अर्जुन डांगळे कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात स्त्रिया लिहीत आहेत, त्यांच्या कवितेच्या आशयात, काव्यविषयक दृष्टिकोनात, शैलीत कसकसे बदल होत आले आहेत आणि मराठीच्या प्रदीर्घ काव्यपरंपरेत स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारी स्त्रियांची कविता आज कोणत्या टप्प्यावर उभी आहे याची चिकित्सा करणारा ग्रंथ. पया कवितांत शहराचे असंख्य आवाज ऐकायला मिळतात. त्यातली उदासी, तुच्छता, माशासारखी तडफड, विद्रोह आणि चिरडल्या जाणा-या आत्म्याच्या वेदना ऐकायला मिळतात. कोणताही आकांत ऐकायला या शहरापाशी वेळ नाही, याची नग्न जाणीव या कवितेतल्या शब्दांतून पाझरते. - जयंत पवार
दीडदमडीना देशीवाद : समाज आणि साहित्य भक्ती आणि धम्म समता संघर्ष मार्गदर्शिका
लेखक : वर्जेश ईश्वरलाल सोलंकी लेखक : रावसाहेब कसबे लेखक / रावसाहेब कसबे संपादन : सुनील दिघे
पाने : १०४ किंमत : रु. १३० पाने : ४८४ किंमत : रु. ६०० पाने : ६९६ किंमत : रु. ९७५ पाने : २६२ किंमत : रु. ३००
कविता आणि गद्य यांच्या सीमेवर वावरणारं हे लेखन त्यातून व्यक्त झालेल्या अनुभवांतील प्रामाणिकपणा, लेखकाचा संवेदनशील स्वभाव, बोलभाषेला जवळ जाणारी निवेदन शैली अशा वैशिष्ट्यांमुळे मनाला भिडतं. आपल्यातील कवित्व शक्तीचा शोध घेऊ पाहणा-या लेखनाप्रमाणेच आपल्या व्यक्तिमत्त्वातील विविध कंगो-यांचा, स्खलनशील नैसर्गिक वृत्तिप्रवृत्तींचा व निवेदकाच्या जगण्याचा एखादा कोपरा व्यापणा-या व्यक्तिरेखांचा शोध हेही या ललित लेखनाचं महत्त्वाचं अंग आहे. - प्रवीण दशरथ बांदेकर आज मानवजातीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांना परत मागे फिरून तोंड देता येणार नाही. हे शतक जागतिकीकरणाचेच असणार. त्यात संस्कृतींसह सर्वांचेच अभिसरण होणार. त्यातून भांडवलशाही तिचे अत्युच्च टोक गाठणार की समाजवाद हे आज कोणालाही सांगता येणार नाही; परंतु एका नव्या दर्शनाच्या सर्जनाची आवश्यकता सर्वांनाच वाटत आहे. ‘भक्ती आणि धम्म’ या ग्रंथात भक्तीची शक्तिशाली, संघर्षशील, विद्रोही आणि बंडखोर रूपे प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दाखवली आहेत. जगभर तयार झालेले विविध भक्तिप्रवाहांचे सम्यक दर्शन हा ग्रंथ घडवतो. भारतातील बाऊल, अलवार यांसारखे दुर्लक्षित प्रवाहही या ग्रंथात अवतरतात. समता संघर्ष मार्गदर्शिका पुस्तकाची वैशिष्ट्ये :  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले जनतेचे संघर्ष.  भारतीय संविधानातील निवडक व महत्त्वाची कलमे.  संविधानाची पहिली प्रत, देखणे स्वरूप (वर्णनात्मक) आणि डॉ. आंबेडकरांची त्यावर असलेली स्वाक्षरी.
वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा पुरोगामी बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक संघर्ष सन्मानासाठी... माणुसकीसाठी रणांगण चवदार तळ्याचे
लेखक : जयंत पवार लेखक : राकेश वानखेडे लेखक : जयंत पवार संपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणे
पाने : १७६ किंमत : रु. २०० पाने : ३२४ किंमत : रु. ४०० पाने : २८ किंमत : रु. २० पाने : २८ किंमत : रु. २०
कथारचना, भाषा, प्रसंग, पात्रे आणि संवाद ह्यातल्या प्रत्येक अंगातील नावीन्य आणि औचित्य ह्यामुळे सहसा कधी न मिळणारा आनंद हा कथासंग्रह वाचून मिळाला. मराठीत अशा प्रकारचे काही वाचायला मिळाल्याचा खास आनंद झाला. या कादंबरीतील सर्व पात्रे या मातीतील पुरोगामी चळवळींशी संबंधित आहेत. त्यांची चर्चा लेखकानं अतिशय आत्मीयतेनं केली आहे. त्यामुळे या कादंबरीचा आवाका एका विशाल सामाजिक पटलावर जातो. असं लेखन अलीकडे मराठी कादंबरीत क्वचितच घडलेलं दिसतं. १७-१८ जानेवारी २०१५ रोजी बुलडाणा येथे झालेल्या तेराव्या विद्रोही साहित्य संमेलनात जयंत पवार यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणे.
कष्टक-याचे सनातन शत्रू ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही परिवर्तन चळवळ : एक संघर्ष यात्रा एनिमेशन की अधूरी कहानी (भीमसेन)
संपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणे लेखक :प्रा. आनंद मेणसे लेखक : भिमसेन
पाने : २८ किंमत : रु. २० पाने : २८ किंमत : रु. २० पाने : १३२ किंमत : रु. ८५०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणे प्रा. आनंद मेणसे हे राजकीय अभ्यासक आहेत. त्यांची मांडणी आणि भाषा साधी, सरळ आणि सोपी आहे. आपल्या विधानांच्या पृष्ट्यर्थ ते अनेक दाखले आणि उदाहरणे देतात. सर्वसामान्य वाचकांकरता आजच्या परिस्थितीकडे डोळसपणे, चिकित्सापूर्वक बघायला ही पुस्तिका निश्चितपणे उपयुक्त ठरेल. Incompleye Story of Animation (Bhimsen)