२०१२ मधील प्रकाशित पुस्तके येथे क्लिक करा .

२०१३ - २०१४ मधील प्रकाशित पुस्तके

सैली : १३ सप्टेंबर दु:खहरण विवेक मोहन राजापुरे यांच्या कथा कुरण
लेखक : श्रीकांत सिनकर डॉ सुनीलकुमार लवटे संपादक : प्रदीप कर्णिक लेखक : रामचंद्र नलावडे
पाने : २१६ किंमत :रु. २७० पाने : १२८ किंमत : रु. १३० पाने : २५२ किंमत : रु. ३०० पाने : २६० किंमत : रु. ३००
व्यक्तिचित्रणांची सज्जड परंपरा असणा-या मराठी साहित्य विश्वात जळजळीत वास्तव मांडणारे, रूढार्थाने व्यक्तिचित्रण नसून ‘संबंध-चित्रणा’च्या घाटाने जाणारे, खास श्रीकांत सिनकरांच्या ‘चित्तरकथा’ शैलीतल्या अधोलोकाची झलक दाखवणा-या कथा! अभावग्रस्त, दु:खी-दरिद्री आयुष्य जांच्या वाट्याला आलेलं आहे, अशा वंचित समूहाचं जगणं डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या दु:खहरण या कथासंग्रहात चित्रित केलं आहे. विवेक मोहन राजापुरेच्या कथांमधील अस्सलपणा इतका प्रत्ययकारक आहे, की त्याने लिहिलेला प्रत्येक विषय त्याने स्वत: जगून पाहिल्यासारखा वाटतो. इतकी उदंड कल्पनाशक्ती माझ्या पाहण्यात फारच क्वचित आली आहे. – प्रिया तेंडुलकर दैनंदिन लोकव्यवहाराशी संबंधित शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा अगदी आतून वेध घेत या भ्रष्टाचारामागील सूक्ष्म पदर प्रत्ययकारीपणे उलगडून दाखविणारी कादंबरी. या यंत्रणांमधून काम करणारे कनिष्ठ व मध्यमवर्गीय कर्मचारीही भ्रष्टाचारात बरबटून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या -हासाबरोबरच वैयक्तिक जीवनातील शोकांतिकेला कशी बळी पडतात याचे चित्र ही कादंबरी वास्तवदर्शी पद्धतीने साकार करते.
पन्नास टक्क्यांची ठसठस प्रतिमा-प्रचीती निवडक ऋतुरंग इर्जिक
लेखक : उत्तम कांबळे नितीन दादरावाला संपादक : अरुण शेवते अरुण जाखडे
पाने : १४२ किंमत रु. १८० पाने : ४२४ किंमत रु. ५०० पाने : ६४८ (पुठ्ठाबांधणी) किंमत रु. ७५० पाने : १८४ / किंमत रु. २००
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के राखीव जागा म्हणजे भारतीय महिलांच्या राजकीय प्रवासातील एक छोटी क्रांतीच होती. महिला खुर्चीत आहेत पण सूत्रे मात्र व्यवस्थेने आपल्याच हातात ठेवली आहेत. महिला अधिकारावर आहेत पण अधिकार मात्र तिच्या भोवतालच्या दृश्यअदृश्य व्यवस्थांच्या सावल्याच वापरत आहेत. पन्नास टक्क्यांमध्ये घुसमट सोसणा-या जिवांची ही हृदयद्रावक आणि लढाऊ चित्तरकथा. मराठीत यापूर्वी कधीही प्रकाशित न झालेला एक आगळा-वेगळा ग्रंथ! विदेशातील पंचवीस छायाचित्रकारांचा परिचय करून देणारे चित्रकार आणि कवी नितीन दादरावाला यांचे अनोखे पुस्तक! उत्तमोत्तम छायाचित्रांचा स्वतंत्रपणे आस्वाद घेता घेता छायाचित्रांच्या इतिहासांतून वावरण्याचा आनंद मिळवून देणारे लिखाण! गुलजार, भीमसेन जोशी, सलील चौधरी, सुंदरलाल बहुगुणा, मेहमूद, भालजी पेंढारकर, बिमल रॉय, व्ही. शांताराम, मोहन गोखले, बी. विठ्ठल, ए. पी. जे. अब्दुल कलाम, कैफी आझमी, सोनिया गांधी, के. के. हेब्बर, आचार्य अत्रे, पं. जवाहरलाल नेहरू, एडविना, अमृता शेर-गील, इंदिरा गांधी, माई आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, मुख्तार माई, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, कमला काकोडकर, हिरा पवार, साहिर, सलीम अली, जे.के. रोलिंग, मनसुखशेठ, अमृता प्रीतम, महाश्वेता देवी, मायावती, सखुबाई संभाजीराव शिंदे, कृष्णाबाई संभाजीराव शिंदे, कॅथरिन ग्रॅहम, डोना हॉवेल, रा. चिं. ढेरे, ज्यॉ फ्लॉदे कॅरिए, रॉबिन डोव्हिडसन, कुमुदिनी दत्तोपंत जोशी, जावेद अख्तर, लॉरेन्स दिब्रिटो, प्रेमा कंटक, कॉर्नेलिया सोराबजी; अशा मोठ्या व्यक्तिमत्त्वांना माणूस म्हणून समजून घ्यायचे असेल तर हा ग्रंथ संग्रही हवा. पानोपानी माणसाच्या अंतरंगाचे दर्शन घडवणारा ग्रंथ. ‘इर्जिक’ या लेखसंग्रहात शेती-मातीचे, कृषिजीवनाचे, सण-सोहळ्याचे आणि ग्रामव्यवस्थेचे सूक्ष्म, तपशीलवार आणि रसिले चित्रण केलेले आहे. आपल्या अनुभवाला अरुण जाखडे यांनी त्यांच्याजवळ असणा-या सखोल आणि चौफेर ग्रंथव्यासंगाची जोड दिली आहे. जाखडे यांच्याजवळ असणारे समृद्ध भूमिप्रेम, निसर्गप्रेम या लेखसंग्रहातून स्पष्ट झाले आहे.
भारतीय डाक-पत्रांचा इतिहास प्राध्यापक लिमिटेड दृश्यकला आणि साहित्य पाकिस्तान : समाज आणि संस्कृती
लेखक : सदानंद सिनगारे जयदेव डोळे लेखक : वसंत आबाजी डहाके फीरोज अशरफ, अनुवाद : हिरा जनार्दन
पाने : २१२ किंमत रु. २५० पाने : १६४ किंमत रु. २०० पाने : २०० किंमत रु. २५० पाने : २४८ किंमत रु. ३००
भारतीय डाकसेवेच्या इतिहासाचे संशोधन करून त्याची सुसंगत मांडणी सदानंद सिनगारे यांनी या पुस्तकात केली आहे. मध्ययुगीन कालखंडापासून आजच्या आधुनिक कालखंडापर्यंत डाकसेवेत कसकसे बदल होत गेले व डाकसेवेची सद्य:स्थिती कशी आहे याबद्दलची रंजक आणि उद्बोधक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराष्ट्रातील उच्च शैक्षणिक वातावरण सुमार दर्जाच्या आणि केवळ व्यवस्थापकीय कौशल्य अंगी असणा-या प्राध्यापकांमुळे निर्जीव झाले आहे. ग्रामीण भागात तर ‘भयंकर बीभत्स गारठा’ झोंबत असतो. हा गारठा निघून जावा, वैचारिक मंथनातून उष्णता यावी आणि महाराष्ट्र खरा पुरोगामी व्हावा या सदिच्छेतून जयदेव डोळे यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह. साहित्याच्या भाषेशी म्हणजे प्रतिमा-प्रतीक-रूपक-मिथकयुक्त भाषेशी दृश्य-कलांच्या भाषेचा अनुबंध कशा रीतीने जोडता येतो, चित्र, छायाचित्र, रंगभूमी, चित्रपट या कलाक्षेत्रांतील विचारव्यूहांचा, निर्मितीचा, प्रयोगांचा, बदलांचा संदर्भ साहित्याला आणि साहित्यविचाराला का ध्यानात घ्यावा लागतो यावर भाष्य करणाNया लेखांचा संग्रह. पाकिस्तानातील साहित्य-संस्कृती, समाज जीवन-राजकारण अशा सर्वच अंगांचा नेमकेपणाने परिचय करून देणा-या पत्रकार-लेखक फीरोज अशरफ यांच्या लेखसंग्रहाचा मराठी अनुवाद.
निराळं जग, निराळी माणसं अ लिव्हिंग फेथ प्रदीर्घ वाटचाल : स्वाधीनतेकडे चित्रकार अमृता शेर-गील
लेखक : डॉ सुनीलकुमार लवटे लेखक : असगर अली इंजिनिअर / अनुवाद : जयदेव डोळे नेल्सन मंडेला / अनुवाद : अशोक मोकाशी रमेशचंद्र पाटकर
पाने : १३६ किंमत रु. १५० पाने : ३४८ किंमत रु. ३५० पाने : ५८९ किंमत रु. ६०० पाने : १५२ किंमत रु. ३०० (मोठा आकार
भारतीय समाजातील मुख्य प्रवाहाने दुर्लक्षित केलेल्या वेश्या, निराधार, अपंग, मनोरुग्ण अशा अनेक समूहांसाठी झटणा-या अनेक संस्था व सेवाभावी माणसे समाजात आहेत. अशा लोकसेवकांच्या निराळ्या जगावर प्रकाशझोत टाकणारा लेखसंग्रह. सांप्रदायिकता विरोधी चळवळीच्या आघाडीवर राहिलेल्या आणि त्यासाठी प्रसंगी जीवघेण्या हल्ल्यांनाही तोंड द्यावं लागलेल्या असगर अली इंजिनिअर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा स्पष्टपणे उलगडा करणारे अत्यंत वाचनीय आत्मकथन! सर्व धर्मश्रद्धांना कवेत घेणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सर्व नेत्यांशी असगर अलींचा जो परस्पर संबंध आला त्याचे हे प्रत्ययकारी चित्रण! नेल्सन मंडेला हे दोन शब्द उच्चारताच केवळ दक्षिण आफ्रिकेतीलच नव्हे तर जगभरातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या अंगावर रोमांच उठतात. दक्षिण आफ्रिकेतील गरिबी, वर्णभेद, आर्थिक असमानता अशा अनेक समस्यांचा निपटारा करण्यासाठी नेल्सन मंडेला यांनी दिलेली रोमहर्षक झुंज आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्य यांचं उत्कृष्ट प्रतिबिंब त्यांच्या या आत्मचरित्रात उमटलेलं आहे. चित्रकार अमृता शेर-गील या पुस्तकात अमृता शेर-गील यांच्या चित्रांच्या रंगीत छायाप्रतींसोबत त्यांची काही पत्रे, लेख व दैनंदिनीतल्या नोंदी तसेच रमेशचंद्र पाटकर यांची विवेचक प्रस्तावना व त्यांनी लिहिलेला छोटेखानी चरित्रपट यामुळे हा ग्रंथ संग्राह्य झाला आहे.
हो चि मिन्ह अर्नेस्टो चे गव्हेरा सोपा समाजवाद परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा
कृष्णा मेणसे अरविंद रेडकर उमाकांत मोकाशी संपादक : किशोर बेडकिहाळ
पाने ६४ किंमत रु. ६५ पाने ११६ किंमत रु. १२० पाने ७६ किंमत रु. ७० पाने ३२४ किंमत रु. ३५०
व्हिएतनाम चळवळीतील झुंजार नेते कॉ. हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्याचा अत्यंत रोमहर्षक असा इतिहास मराठीतील एक सिद्धहस्त लेखक-पत्रकार आणि साम्यवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते कॉ. कृष्णा मेणसे यांनी लिहिला आहे. क्युबन क्रांतीतील धगधगता अंगार असलेल्या अर्नेस्टो चे गव्हेरा याच्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र वेध घेणारे पुस्तक. मानवी समाजाचा ख-या अर्थाने विकास होऊन नवी मानवकेंद्री, समताधिष्ठित समाजवादी व्यवस्था उभी करण्यासाठी इतर अनेक गोष्टींबरोबरच शास्रशुद्ध विचारांच्या भक्कम पायाची गरज आहे. या भूमिकेतून समाजाचे सखोल प्रबोधन होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मोलाचा हातभार लावील. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू पाहणा-या वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांनी १९७९ ते २००१ या कालखंडात सामाजिक, राजकीय, वाङमयीन विषयांवर लिहिलेल्या दहा निवडक लेखांचा संग्रह. मार्क्सवाद, समाजवाद तसेच फुले-आंबेडकरी विचारांच्या भूमिकांची चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण रितीने केलेली मांडणी वाचकाला प्रश्नांकडे समग्रतेने पाहण्याचे भान देते.
महागाई : एक अवलोकन जमीन सुधार व दलित आदिवासी राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद दोन जुने अभिजात अर्थशास्त्रीय निबंध
रमेश पाध्ये गौतम खुशालराव कांबळे प्रा. राम बापट, संपादक : प्रा. अशोक चौसाळकर संपादक : नीरज हातेकर / राजन पडवळ
पाने १७८ किंमत रु. २०० पाने ३५२ किंमत रु. ४०० पाने २४२ किंमत रु. ४०० पाने १४० किंमत रु. १४०
सामान्य माणसाला भेडसावणा-या ‘महागाई’ या आजच्या प्रमुख समस्येची नेमकी आकडेवारी, सुबोध विश्लेषण आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करणारा महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ. भारतीय पार्श्वभूमीवर दलित-आदिवासींसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणा-या आंबेडकरांच्या तत्त्वप्रणालीचा नव्या ग्रामीण बदलांचा वेध घेऊन नवा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न या ग्रंथात विशेषत्वाने करण्यात आला आहे. विविध सामाजिक चळवळी आणि त्यांचे स्वरूप, पर्यावरणवाद, जातीसंस्था, स्त्री-दास्य निर्मूलन, भारतीय संस्कृती व तिचा राष्ट्रवादाशी असणारा संबंध अशा विविध विषयांवरील प्रा. राम बापट यांच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह.‘परामर्श’ नंतरचा प्रा. राम बापट यांच्या लेखनाचा दुसरा खंड. एकोणिसाव्या शतकातील अर्थविषयक विचार समजून घेण्यास उपयुक्त ठरतील अशी हिंदुस्थानांतील दुष्काळ आणि निरपेक्ष भांडवल ही दोन पुस्तके एकत्रित स्वरूपात.
अणुबॉम्ब अणुऊर्जा तीरे-तीरे नर्मदा आम्ही हिंदुस्थानी
अतुल कहाते अतुल कहाते अमृतलाल वेगड, अनुवाद : मिनल फडणीस लहू कानडे
पाने २२३ किंमत रु. ३३० पाने २५६ किंमत रु. ३०० पाने १८४ किंमत रु. २०० पाने ११६ किंमत रु. १५०
इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ, राजकारण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा आढावा घेत घेत माणसानं अणूपासून अणुबॉम्बपर्यंत केलेला प्रवास आणि त्यानंतरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नाट्य या पुस्तकात वाचायला मिळेल. सर्वसामान्य वाचकाची या विषयामधली भूक पूर्णपणे भागवणारं आणि अणुबॉम्बचं मानवतावादी दृष्टिकोनातून भान देणारं हे पुस्तक आहे. अणुऊर्जेचं तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणारं, त्यामधल्या सगळ्या धोक्यांची सखोल माहिती अगदी सामान्य वाचकालासुद्धा समजेल अशा भाषेत सांगणारं आणि अणुऊर्जेसंबंधीच्या सत्याचा उलगडा करणारं हे पुस्तक आहे. त्यात एका सर्वसामान्य नागरिकाला आपल्या पर्यावरणाविषयी आणि भविष्याविषयी वाटणारी कळकळ पानोपानी दिसेल. जर शंभर किंवा दोनशे वर्षांनंतर एक दांपत्य नर्मदा परिक्रमा करताना दिसलं, नव-याच्या हातात केरसुणी आणि बायकोच्या हातात टोपली आणि खुरपी; नवरा घाटांची स्वच्छता करत असेल आणि बायको कचरा लांब नेऊन फेकत असेल आणि दोघं वृक्षारोपण सुद्धा करत असतील, तर मग समजून घ्या की ते आम्हीच आहोत — कान्ता आणि मी. सदरच्या निबंधसंग्रहामधून लहू कानडे यांच्या प्रागतिक वैचारिकतेचा प्रत्यय येतो. तळागाळातील कष्टक-यांबद्दलची अतूट बांधिलकी कवितेप्रमाणेच या गद्य लेखनातही दिसून येते.
समाजवादी सिद्धान्त आणि संस्कृती मार्क्स काय म्हणाला लोकलेणी जागतिक वित्त भांडवलशाली : भांडवली पद्धतीचा अंतिम चरण
अनुवादक : दि. वा. फडणवीस
प्रस्तावना : गो. पु. देशपांडे
उदय नारकर संपादक:डॉ.प्रकाश खांडगे ,मुकुंद कुळे
संपादन सहाय्य:डॉ.गणेश चंदनशिवे,प्रा.मोनोका ठक्कर
चंद्रकांत केळकर
पाने २०० / किंमत रु. २०० पाने २०० / किंमत रु. २०० पाने १४४ / किंमत रु. २०० पाने १८० / किंमत रु. १८०
या ग्रंथात लेनिनची तेवीस स्फुटे समाविष्ट करण्यात आली आहेत. परिवर्तनवादी मंडळींनी काय भान ठेवले पाहिजे याचे मार्गदर्शन हे पुस्तक करते. ‘मार्क्सचा विचार कामगार-कष्टक-यांना समजेल अशा भाषेत त्यांच्यासमोर मांडावा, त्यावर विविध भाषांतून झालेल्या सोप्या पण चांगलं लिहिणा-यांची आपल्या वाचकांशी भेट घडवून आणावी’ असं सतत वाटत असणा-या उदय नारकरांच्या वाचनात टेरी इगल्टन यांचे ‘व्हाय मार्क्स, वॉज राईट’ हे पुस्तक आले. त्याचे सुबोध मराठीत व आपल्या संदर्भात केलेले हे पुनर्कथन. लोकसाहित्याच्या व्यापक पसा-याकडे महाराष्ट्रातील अनेक संशोधक सजगपणे पाहत आहेत, परंपरेचा नव्याने अन्वय लावत आहेत तर लोककलावंतांनी काळाच्या कसोटीवर टिकून राहत आपली उर्जस्वल परंपरा कायम राखली आहे. अशा संशोधक व लोककलावंतांच्या मुलाखतींचा संग्रह. जागतिकीरणात श्रम ह्या मानवी स्वरूपात वावरणा-या उत्पादन घटकाची झालेली फरपट आपण पाहत आहोत. मग ती फरपट म्हणजेच बहुसंख्यांचा विकास आहे की समाजाकरता विकासाची वेगळी पद्धती व उद्दिष्टे असू शकतात का, या दृष्टिकोनातून गेही ४४०-४५ वर्षे प्राचार्य केळकरांनी चिंतन व लेखन केले आहे. त्याचेच दृश्य फळ म्हणजे हा लेखसंग्रह होय.
आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध सेक्स मार्केट मराठी संतांचे सामाजिक कार्य ललितचिंतन
भुजंग मेश्राम
संपादक : प्रफुल्ल शिलेदार
पराग महादेव गावकर डॉ. विष्णु भिकाजी कोलते
अनुवाद : सुमती रमाकांत कोलते
दि. के. बेडेकर
पाने : २०० / किंमत २४० पाने : ८४ / किंमत ९० पाने : १६० / किंमत : २०० / दुसरी आवृत्ती पाने : १३२ / किंमत : १६० / दुसरी आवृत्ती
कवी भुजंग मेश्राम यांच्या गद्य लेखनाचा पहिलाच संग्रह. भुजंग मेश्राम यांनी विविध आदिवासी साहित्य संमेलनांतून केलेली भाषणे, ‘हाका’, ‘नवभारत’ आदी नियतकालिकांमधून आदिवासी साहित्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख आणि विशेष बाब म्हणजे भुजंग मेश्राम यांच्या गोंडी भाषेतील कवितांचा पहिला संग्रह व त्याचा मराठी अनुवाद असे महत्त्वपूर्ण साहित्य यात वाचायला मिळेल. गोव्यातील बायना येथे चालणा-या वेश्या व्यवसायाचे स्वरूप कसे होते, येथील वेश्या कोणत्या परिस्थितीत जगत होत्या तसेच त्यांना या नरकयातनांतून काही अंशी मुक्त करण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कशा पद्धतीने लढले, या सा-याविषयी रिपोर्ताज पद्धतीने लिहिलेले पराग गावकरांचे नवे पुस्तक. लोकसाहित्याच्या व्यापक पसा-याकडे महाराष्ट्रातील अनेक संशोधक सजगपणे पाहत आहेत, परंपरेचा नव्याने अन्वय लावत आहेत तर लोककलावंतांनी काळाच्या कसोटीवर टिकून राहत आपली उर्जस्वल परंपरा कायम राखली आहे. अशा संशोधक व लोककलावंतांच्या मुलाखतींचा संग्रह. ‘ललितिंचतन’ या संग्रहात एकत्र केलेले लेखन नेहमीपेक्षा जरा वेगळ्याच प्रकारचे आहे. एखादा विषय घेऊन त्याचे शिस्तशीर विश्लेषण करण्याचा प्रयत्न येथे नाही; साध्याच गोष्टीकडे पाहताना तिचे दुर्लक्षित असे एखादे विलक्षण अंग, मानव जीवनाच्या संदर्भातला तिचा वेगळाच असा एखादा अर्थ सुचवण्याचा व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. - सुधीर बेडेकर
मार्खेजची गोष्ट वाचताना पाहताना जगताना
सुनील तांबे नंदा खरे
पाने : १०४ / किंमत : १२० पाने : १४८ / किंमत : २००
अद्भुतता, कल्पनाशक्ती यांची वास्तवाशी सांगड घालण्याचं मार्खेजचं तंत्र उलगडण्यासाठी त्याचं जीवन, त्याच्या परिसराचं सामाजिक-राजकीय वास्तव यांचा शोध घ्यावा लागतो. मार्खेजच्या जादूई वास्तववादाचं तंत्र आणि मंत्र उलगडलं तर मराठी कथात्म साहित्यातील घाट आणि कला यांचं आकलन अधिक समृद्ध होईल.- सुनील तांबे एकारलेल्या शहाणपणापेक्षा जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श करत त्यातले परस्परसंबंध तपासणारे नंदा खरे यांचे ‘कुतूहलमिश्रित भान’ मला महत्त्वाचे वाटत आले आहे. आपल्या विशिष्ट अभ्यासविषयाच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यासविषय समग्र जगण्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येणे ही मला त्यांच्या बाबतीतली महत्त्वाची गोष्ट वाटते. त्याचा परिणाम त्यांच्या या लेखनातून खूप तपशिलाने पाहता येईल. - सतीश काळसेकर