२०१२ मधील प्रकाशित पुस्तके

आगळ आमचचं जगणं,आमचं लिहिणं निवडक अबकडइ आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान
लेखक : महेंद्र कदम अनुवाद :निला चांदोरकर संपादन : सतिष काळसेकर / अरुण शेवते लेखक : अविनाश फुलझेले
पाने - २५२ / किंमत : रु. २५० पाने - ३३२ किंमत : रु. ३०० पाने - ६३३ / किंमत : रु. ८०० पाने - २६४ / किंमत : रु. २५०
शेतकरी कुटुंबातला तरुण प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतो, शिकून नोकरीसाठी गाव सोडतो, यांतून येणा-या ताणतणावांचे चित्रण करणारी कादंबरी. आजच्या काळातील निवडक सर्वोत्कृष्ठ लेखिकांशी त्यांच्या साहित्यकृती विषयी आणि एकूणच लेखिका म्हणून जाणीवांविषयी, घडणीविषयी मुलाखतींच्या माध्यमातून साधलेला मोकळा, पारदर्शी संवाद! २४ वर्षांतल्या २१ दिवाळी अंकांतील नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, राजा ढाले, सतीश काळसेकर यांच्यासारख्या निवडक नामवंत लेखकांच्या लेखनाचा दर्जेदार संग्रह! दादासाहेब गायकवाडांचे आंबेडकरी चळवळीतील आणि त्याशिवायचेही कार्य अधोरेखित करणारा आणि आंबेडकरी चळवळीतील आणि त्याबाहेरच्या परिघात असलेल्या सामान्य माणसांना, कार्यकर्त्यांना, समाजचिंतकांना, लेखक, भाष्यकार इत्यादींना दिशादर्शक ठरू शकणारा, सर्वांगीण विकासाला उपयुक्त ठरणारा ग्रंथ.
अवलोकन : मराठी समीक्षा आणि साहित्य बारा भाषणे बया दार उघड भीमायन अस्पृश्यतेचे अनुभव
लेखक : दिगंबर पाध्ये कॉ. श्रीपाद अमृत डांगे लेखक : सुषमा देशपांडे अनुवाद : अल्पना कुबल
पाने – २९६ / किंमत – रु. ३०० पाने – १७१ / किंमत – रु. १५० पाने – ८० / किंमत - रु. १०० पाने – १०८ / किंमत – रु. २००
मराठी भाषा, समाज, साहित्य आणि संस्कृती यासंबंधी मूलगामी विवेचन करणा-या मार्क्सवादी साहित्य सिद्धांताचा परिचय करून देणा-या ज्येष्ठ समीक्षक दिगंबर पाध्ये यांचा समीक्षात्मक लेखांचा संग्रह. आमच्या गुंतागुंतीच्या आणि व्यामिश्र वास्तवात कॉ. डांगे यांची राजकीय-सामाजिक विषयांवरील आजही प्रस्तुत व उपयुक्त वाटावीत अशी भाषणे. संत स्त्रियांच्या रचना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणारे नाटक. तरुण वर्गाला आकर्षित करेल अशा चित्रभाषेतून बाबासाहेबांचं जीवन व कार्य उलगडणारं, मध्यप्रदेशातील आदिवासी चित्रकार दांम्पत्याने प्रधान गोंड शैलीत चितारलेलं अनोखं पुस्तक. मोठा आकार, रंगीत चित्रे, सुबोध भाषा
चित्रव्यूह डाकीण : अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ दलित कविता आणि प्रतिमा गोष्ट न सांगता येण्याविषयीची
लेखक : अरुण खोपकर अनुवाद : संध्या नरे पवार लेखक : महेंद्र भवरे लेखक : वसंत आबाजी डहाके
पाने – २०० / किंमत – रु. ३५० पाने – २८४ / किंमत – रु. २८० पाने – ३२४ / किंमत – रु. ३५० पाने – १९६ / किंमत – २००
अरुण खोपकर यांना अगदी लहानपणीच मामा वरेरकर, पु. ल. देशपांडे अशा नामवंतांचा सहवास लाभला. याशिवाय बारा भाषा येणारा भास्कर पानपट्टीवाला, बालमोहन शेजारचं आंब्याचं झाड अशा अनेक अनुभवांनी त्यांचं बालविश्व समृद्ध झालं आणि पुढे कलाक्षेत्रात आल्यावर विस्तारतच गेलं. त्या सा-याचं वाचकालाही श्रीमंत करणारं चित्रण. संध्या नरे पवार आदिवासींमध्ये प्रचलित आणि आदिवासी स्त्रीच्या जगण्याचा छळ मांडणा-या डाकीण या अघोरी प्रथेविषयी सांगोपांग चर्चा करणारे पुस्तक. दलित कवितेची भाषा, अभिव्यक्ती, प्रतिमा, शैली या अनुषंगाने केलेला विविधांगी अभ्यास. वसंत आबाजी डहाके यांचा नवा आगळा ललित लेखसंग्रह. समाजव्यवस्थेत दडपल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या छातीत एक गोष्ट कोंडलेली असते. गोष्ट सांगणं म्हणजे ‘मुक्या’ स्त्री ने ‘बोलकं’ होणं. विविध विषयांवर मनापासून ‘बोलक्या’ झालेल्या अनुभवांची अभिव्यक्ती!
चलत्-चित्रव्यूह गन-गन भोवरी इंधन ज्वालेचे फूल : शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाड्.मय
लेखक : अरुण खोपकर लेखक : इसादास भडके लेखक : डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रा. रणधीर शिंदेे
पाने – २७६ / किंमत – ४२५ पाने – २४० / किंमत – २०० पाने – १८० / किंमत – २००
विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या अरुण खोपकर यांच्या कला चित्रपटांच्या निर्मितीच्या काळात त्यांना महाराष्ट्रातल्या आणि भारतातील महान कलाकारांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे कलांबद्दलच्या त्यांच्या कुतूहलाने त्यांच्या सर्जनशील अंतरंगाचा वेध घेता आला. त्यासंबंधी जाणीवपूर्वक केलेलं लेखन इसादासच्या आईचं बालपण हिंदू धर्मात होरपळून निघालं, वैवाहिक जीवन आणि वैधव्य ख्रिस्ती धर्मात न्हाऊन निघालं, म्हातारपण बौद्ध धम्मात एकरूप झालं. मातीच्या भाषेत मांडलेला आईचा आणि आजीचा एक यातनामय प्रवास. भारतीय समाजातील सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक व आर्थिक स्थितींचे समग्र दर्शन घडवणा-या लेखसंग्रहाचे पुनर्मुद्रण स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणारे मार्क्सवादी साहित्यिक शरच्चंद्र मुक्तिबोध यांचे जीवन व साहित्य विशद करणारा वाचनीय दस्तऐवज.
कालबद्ध निर्मिती : दिशा आणि तंत्र आधारस्तंभ : प्राचार्य ल. बा. रायमाने माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट माझ्या मना बन दगड
अनुवाद : उद्धव कांबळे संपादन – अविनाश डोळस / राम दोतोंडे अनुवाद – कांचन निजसुरे / रमेश पाध्ये परामचंद्र नलावडे
पाने – १०४ / किंमत – १२५ पाने – २५२ / किंमत – ५०० पाने – ३२६ / किंमत – २०० पाने – १५२ / किंमत - २००
प्रबंध व ग्रंथ लिहू पहाणा-या लेखकाला लेखनाची शिस्त आणि काळाचे नियोजन यांविषयी बहुमोल मार्गदर्शन करणा-या पुस्तकाचा मराठी अनुवाद. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक ते प्राचार्य असा प्रवास करतानाच्या दरम्यान अनेक साहित्यिक उपक्रम आणि सामाजिक चळवळी यांत मोलाचे कार्य करणारे प्राचार्य ल. बा. रायमाने यांचा गौरवग्रंथ. भांडवलशाहीच्या ऐतिहासिक वाटचालीचा मागोवा, घेणारे हे पुस्तक मराठी वाचकांना, विशेषत तरुण वाचकांना उपयुक्त वाटेल. खेड्यापाड्यातील लोकांचा शासकीय व्यवहाराशी घनिष्ठ संबंध असणारे खाते म्हणजे महसूल खाते व तहसील कचेरी. या खात्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे भान ठेवून प्रामाणिकपणे काम करणा-या माणसाची होणारी कुचंबणा, घालमेल व आलेले बरेवाईट अनुभव याचे प्रत्ययकारी चित्रण.
समग्र निरीश्वरवाद पं.शरच्चंद्र आरोलकर लेणे प्रतिभेचे    प्रतिकार स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर
शरद बेडेकर संपादन : नीला भागवत अनिल सोनार तारा भवाळकर
पाने – १५२ / किंमत – २५० पाने – १४३ / किंमत – २०० पाने – ७४ / किंमत – १०० पाने – १६८ / किंमत – १९०
धार्मिक अहंकार व अध्यात्माची झिंग बळावल्याच्या काळात त्यातून उद्भवणा-या दुष्परिणामांवर निरीश्वरवादाचा उतारा कसा लागू पडेल हे सांगणारे मौलिक पुस्तक. ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावंत गायक शरच्चंद्र आरोलकर ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या प्रतिभेचा आणि व्यक्तीमत्त्वाचा शोध घेणारं, त्यांच्या शिष्या नीला भागवत यांनी संपादित केलेलं पुस्तक. स्वत: नीला भागवत, अरुण खोपकर तसेच दिलिप चित्रे या मान्यवरांचे लेख संकलित व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेले आणि साहित्यमूल्य असलेले प्रयोगशील तसेच वाचनीय नाटक. व्यावसायिक रंगभूमीसाठी असलेला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य कै. मामा पेंडसे सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन’ पुरस्कार प्राप्त तारा भवाळकर संत स्त्रियांच्या आध्यात्मिक मुक्ती कल्पनेचा आणि प्रत्यक्ष जीवन संघर्षाचा आजच्या स्त्री मुक्ती संदर्भात अभ्यासू वृत्तीने शोध घेणारे पुस्तक!
सत्यशोधक श्रमिकांचे जग : काल, आज आणि उद्या विदूषक टाकसाळी कथा
गोविंद पु. देशपांडे संपादक : उत्तम कांबळे प्रभाकर दुपारे संपादन : वसंत सरवटे
पाने – ८४ / किंमत – १२५ पाने – २६३ / किंमत – ४८० पाने – ६० / किंमत – १२० पाने – २६४ / किंमत – २५०
म. ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वेध घेत त्यांचा वैचारिक वारसा वृद्धिंगत करत, त्यातील विचाराला, आशयाला रंगमंचावर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न करणारं नाटक. जागतिकीकरणाच्या नव्या जमान्यात, व्यवस्थेचे खाजगीकरण होऊ पाहण्याच्या काळात श्रमिकांच्या सुरक्षेला व स्वातंत्र्याला कोणतं स्थान असणार आहे, चळवळींची काय भूमिका असायला हवी याची सांगोपांग चर्चा करणारा संदर्भग्रंथ दलित जीवनाच्या संघर्षाला, अस्तित्वाच्या लढाईला शब्दबद्ध करणा-या आणि फुले-आंबेडकरी विचारसिद्धान्ताची बांधिलकी सिद्ध करणा-या प्रभाकर दुपारे यांचे नवे नाटक. अनेक वर्षांपासून मराठी विनोदी लेखनाच्या प्रांतात विविध प्रकारच्या लिखाणाने मोलाची भर टाकणा-या मुकुंद टाकसाळे यांच्या निवडक विनोदी कथांचा संग्रह.
विश्वाचे आर्त तळ ढवळताना नागनाथअण्णा चिंध्यांची देवी आणि इतर कविता
अतुल देऊळगावकर लहू कानडे उत्तम कांबळे नामदेव ढसाळ
पाने – १८८ / किंमत – २५० पाने – ११२ / किंमत – २०० पाने – ५६ / किंमत – १०० पाने – १०० / किंमत – ३००
पर्यावरणीय समस्यांचे स्वरूप जागतिक पण त्यांचे आव्हान मात्र सामाजिक व राजकीय आहे. पण आपला समाज काळाप्रमाणे सुसंस्कृत व जबाबदार होत नाही आहे. हेच विश्वाचे आर्त... आजच्या ग्लोबलाइज्ड आणि चमचमत्या जगात आपलं खुरटवलं गेलेलं जग जपण्यासाठी तारेवरची कसरत करणा-या सर्वहारा वर्गाच्या जगण्याचा ‘तळ ढवळणारी’ कविता सर्वहारांच्या सोनेरी भविष्यकाळाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, फाटक्या तुटक्या माणसांना बरोबर घेऊन परिवर्तनाचा ध्यास घेतला, त्या क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे ओघवत्या भाषेतील चरित्र. ‘गोलपिठा’ ते ‘निर्वाणाआधीची पीडा’ अशा ढसाळांच्या आठ संग्रहातल्या निवडक छपन्न कवितांचे एकत्रित संकलन. स्त्री-पुरुष, शिव-शक्ती किंवा त्याही पलिकडे जाऊन नर-मादी असा एक आदिबंध सळसळत्या चैतन्यानिशी इथे अधोरेखित होतांना दिसतो. प्रभा गणोरकर यांची प्रस्तावना आकर्षक आकार, देखणी निर्मिती
किना-यावरचा कालपुरुष
उत्तम कांबळे
पाने – ११६ / किंमत – २००
कालपुरुषाच्या नजरेतून, समुद्राच्या पार्श्वभूमीवर, माणूस, समाज आणि निसर्ग यांविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी उत्तम कांबळे यांची दीर्घ पल्ल्याची विचार कविता.