२०१२ मधील प्रकाशित पुस्तके येथे क्लिक करा .

२०१३ - २०१४ मधील प्रकाशित पुस्तके येथे क्लिक करा .

२०१५ मधील प्रकाशित पुस्तके येथे क्लिक करा .


२०१६ मधील प्रकाशित पुस्तके


देशीवाद : समाज आणि साहित्य भक्ती आणि धम्म समता संघर्ष मार्गदर्शिका धग असतेच आसपास
लेखक : रावसाहेब कसबे लेखक : रावसाहेब कसबे संपादन : सुनील दिघे लेखक : कल्पना दुधाळ
पाने : ४८४ किंमत : रु. ६०० पाने : ६९६ किंमत : रु. ९७५ पाने : २६२ किंमत : रु. ३०० पाने : १२० किंमत : रु. १५०
आज मानवजातीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांना परत मागे फिरून तोंड देता येणार नाही. हे शतक जागतिकीकरणाचेच असणार. त्यात संस्कृतीसह सर्वांचेच अभिसरण होणार. त्यातून भांडवलशाही तिचे अत्युच्च टोक गाठणार की समाजवाद हे आज कोणालाही सांगता येणार नाही; परंतु एका नव्या दर्शनाच्या सर्जनाची आवश्यकता सर्वांनाच वाटत आहे. ‘भक्ती आणि धम्म’ या ग्रंथात भक्तीची शक्तिशाली, संघर्षशाली, विद्रोही आणि बंडखोर रूपे प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दाखवली आहेत. जगभर तयार झालेले विविध भक्तिप्रवाहांचे सम्यक दर्शन हा ग्रंथ घडवतो. भारतातील बाऊल, अलवार यांसारखे दुर्लक्षित प्रवाहही या ग्रंथात अवतरतात. समता संघर्ष मार्गदर्शिका पुस्तकाची वैशिष्ट्ये : १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले जनतेचे संघर्ष २. भारतीय संविधानातील निवडक व महत्त्वाची कलमे. ३. संविधानाची पहिली प्रत, देखणे स्वरूप (वर्णनात्मक) आणि डॉ. आंबेडकरांची त्यावर असलेली स्वाक्षरी मातीची तहान, पशू-पक्ष्यांची तहान, पिकांची तहान आणि माणसांची तहान शोधत, आपली ओंजळ रिती करत मानवतेचा करुणामय प्रवास करणारी ही कविता आहे. नात्यातल्या विरूपतेची दु:खपूर्ण अवस्था मांडत, सत्त्व जपण्याचा ध्यास असलेल्या या कविता एका परिपक्व मुक्कामापर्यंत पोचल्या आहेत.
श्याम मनोहर यांचे साहित्य : प्रदर्शन आणि दर्शन पोटमारा तेलंगणाची शौर्यगाथा रंगदेवतेचे आंग्लरूप
संपादन : चंद्रकान्त पाटील/रामचंद्र काळुंखे लेखक : रवींद्र पांढरे लेखक : रवि नारायण रेड्डी / अनुवाद : रूपेश पाटकर लेखक : प्रा. अविनाश कोल्हे
पाने : १९२ किंमत : रु. २५० पाने : १२८ किंमत : रु. १६० पाने : ९६ किंमत : रु. १२० पाने : १५२ किंमत : रु. २५०
‘धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह’ हा ग्रंथ विविध ज्ञानशाखांच्या आधारे मानवी विकासक्रम स्पष्ट करून, या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. हा ग्रंथ आजच्या मूलतत्त्ववादाने आणि दहशतवादाने भयभीत झालेल्या मानवजातीस स्वत:चे जगणे सुंदर करण्यासाठी एक नवी दृष्टी देईल. प्रस्तुत कादंबरी सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्याच्या परवडीची प्रातिनिधिक शोकांतिका वास्तवदर्शी पद्धतीने मांडते. हृदयाला स्पर्श करणाऱ्या बोलीत सांगितलेली या कादंबरीतली कथा वाचणाऱ्याच्या काळजाला चटका लावते. त्याला अंतर्मुख करते, अस्वस्थ करते. गावाची शेती, शिवार, लोक यांच्याशी लेखकाची जन्मजात जुळलेली नाळ तुटलेली नाहीय, हे या कादंबरीतून जाणवते. ‘तेलंगणाची शौर्यगाथा’ हे पुस्तक अशा व्यक्तीच्या लेखणीतून साकार झाले आहे, ज्याने तेलंगणाच्या देदीप्यमान सशस्त्र संघर्षात सक्रिय सहभाग घेतला होता. हा संघर्ष हे भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे फार मोठे संचित आहे. या लढ्यातून कम्युनिस्ट चळवळीला खूप शिकता आले. या लढ्याने निजामाच्या सत्तेला हरायला भाग तर पाडलेच, पण त्याचबरोबर जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आणला. अविनाश कोल्हेंची भाषा साधी, सरळ आहे. त्यांची समीक्षा क्लिष्ट परिभाषेत अडकत नाही. ते आपल्या लेखांतून आपण पाहिलेल्या नाटकांचा अनुभव वाचकांना देऊ पाहतात. त्यांच्या अनेक लेखांतून आपण प्रत्यक्ष थिएटरमध्ये बसून तो प्रयोग बघत आहोत असा भास होतो. - शफाअत खान मुंबईतील अमराठी नाटकांवरील लेखांचा संग्रह


भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ९० वर्षपूर्ती निमित्त प्रकाशित झालेल्या सात पुस्तिकासंयुक्त महाराष्ट्र लढा आणि कम्युनिस्ट पक्ष स्फूर्तिदायी स्मरण दुमदुमली ललकार... भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्ट पक्षाचे योगदान भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि गिरणी कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्राचा लढा
संपादन : विजय गणाचार्य लेखक : अविनाश कदम लेखक / आनंद मेणसे लेखक / संजय चिटणीस
पाने : ६४ किंमत : रु. १४० पाने : ८० किंमत : रु. ७० पाने : ४८ किंमत : रु. ३० पाने : ६४ किंमत : रु. ४०
समाजवाद आणि हिंदी सिनेमा निजामशाहीविरोधात मराठवाड्यातील कम्युनिस्टांचा लढा गोवा मुक्ती संग्रामात कम्युनिस्टांचे योगदान
लेखक : गणेश मतकरी लेखक : अॅड. भगवानराव देशपांडे लेखक / प्रा. आनंद मेणसे
पाने : ४० किंमत : रु. ४० पाने : ४८ किंमत : रु. ३० पाने : १२० किंमत : रु. १००

=========================================================================महात्मा फुले आणि त्यांची परंपरा वंदे-मातरम् जन-गण-मन श्रीमंती चंगळ आणि पृथ्वीची होरपळ जातिअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान
लेखक : प्रभाकर वैद्य लेखक : प्रभाकर वैद्य लेखक : शिरीष मेढी लेखक : सचिन माळी
पाने : ३८४ किंमत : रु. ३५० पाने : ३४४ किंमत : रु. ३०० पाने : १२४ किंमत : रु. ११० पाने : १५६ किंमत : रु. १५०
कॉ. प्रभाकर वैद्य यांचा फुलेवाद आणि त्यांच्या वारशाची मीमांसा करण्याचा उपक्रम हाती घेण्यामागचा मुख्य पवित्रा आत्मटीकेचाच आहे. फुले विचाराच्या संदर्भात सुधारणा चळवळ, राष्ट्रीय आंदोलन, साम्यवादी चळवळीची व त्यांच्या विचारांची मीमांसा या ग्रंथात आहे. हे पुस्तक केवळ राष्ट्रगीतासंबंधी झालेल्या तत्कालीन वादविवादाची चर्चा करत नाही. तर या निमित्ताने त्यांच्याशी निगडित देशाच्या इतिहासाचा, स्वातंत्र्य चळवळीचा, फाळणीच्या कारणमीमांसेचा व स्वातंत्र्यानंतर भारतात झालेल्या घडामोडींचा मुळात जाऊन वेध घेते. या पुस्तकातील मांडणी ‘मंथली रिव्ह्यू’ या जगप्रसिद्ध मासिकाचे संपादक असलेल्या जॉन बेलामी फॉस्टर व ब्रेट क्लार्क व रिचर्ड यॉर्क लिखित ‘द इकॉलॉजिकल रिफ्ट’ या पुस्तकावर आधारित आहे. हवामानतज्ज्ञ व वैज्ञानिक डॉक्टर जेम्स हॅनसेन याने लिहिलेल्या ‘स्टॉर्म ऑफ माय ग्रँड चिल्ड्रेन’ या पुस्तकातील वैज्ञानिक मांडणी परिशिष्टात स्पष्ट करण्यात आली आहे. आंबेडकर आणि मार्क्स यांच्या नावाने चालणाऱ्या चळवळींनी स्वत:ला एकमेकांत गुंफून घेतल्याशिवाय या दोन्हीही चळवळींना सशक्त होता येणार नाही, याचे भान आजच्या तरुणाईला येत आहे. सचिन माळी हाच संदेश आपल्या पुस्तकातून तरुणाईला देत आहेत.


डॉ. आंबेडकर श्रमचोरीची गोष्ट वज्रादपी कठोराणि मानवमुक्तीचा एल्गार… नव्या जगाची ललकार
लेखक : तानाजी बाळाजी खरावतेकर लेखक : दशरथ - रुपेश लेखक : राहुल सांकृत्यायन संकलन : नचिकेत कुलकर्णी
पाने : ६२ किंमत : रु. ६० पाने : ५६ किंमत : रु. ३० पाने : २० किंमत : रु. २० पाने : २८ किंमत : रु. २०
कॉ. प्रभाकर वैद्य यांचा फुलेवाद आणि त्यांच्या वारशाची मीमांसा करण्याचा उपक्रम हाती घेण्यामागचा मुख्य पवित्रा आत्मटीकेचाच आहे. फुले विचाराच्या संदर्भात सुधारणा चळवळ, राष्ट्रीय आंदोलन, साम्यवादी चळवळीची व त्यांच्या विचारांची मीमांसा या ग्रंथात आहे. हे पुस्तक केवळ राष्ट्रगीतासंबंधी झालेल्या तत्कालीन वादविवादाची चर्चा करत नाही. तर या निमित्ताने त्यांच्याशी निगडित देशाच्या इतिहासाचा, स्वातंत्र्य चळवळीचा, फाळणीच्या कारणमीमांसेचा व स्वातंत्र्यानंतर भारतात झालेल्या घडामोडींचा मुळात जाऊन वेध घेते. या पुस्तकातील मांडणी ‘मंथली रिव्ह्यू’ या जगप्रसिद्ध मासिकाचे संपादक असलेल्या जॉन बेलामी फॉस्टर व ब्रेट क्लार्क व रिचर्ड यॉर्क लिखित ‘द इकॉलॉजिकल रिफ्ट’ या पुस्तकावर आधारित आहे. हवामानतज्ज्ञ व वैज्ञानिक डॉक्टर जेम्स हॅनसेन याने लिहिलेल्या ‘स्टॉर्म ऑफ माय ग्रँड चिल्ड्रेन’ या पुस्तकातील वैज्ञानिक मांडणी परिशिष्टात स्पष्ट करण्यात आली आहे. आंबेडकर आणि मार्क्स यांच्या नावाने चालणाऱ्या चळवळींनी स्वत:ला एकमेकांत गुंफून घेतल्याशिवाय या दोन्हीही चळवळींना सशक्त होता येणार नाही, याचे भान आजच्या तरुणाईला येत आहे. सचिन माळी हाच संदेश आपल्या पुस्तकातून तरुणाईला देत आहेत.


आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाच्या पाऊलखुणा ‘भारत’ या संकल्पनेची जडणघडण लोकशाही मार्गाने येणारा फॅसिझम जर्मन रहिवास
लेखक : प्रा. रमाकांत यादव लेखक : इरफान हबीब लेखक : उद्धव कांबळे लेखक : तुकाराम गणू चौधरी, संपादक : भालचंद्र नेमाडे
पाने : ८० किंमत : रु. १०० पाने : २० किंमत : रु. १५ पाने : ३२ किंमत : रु. २५ पाने : ३६० किंमत : रु. ३९५
- - स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवी हक्क तसेच लोकशाही मूल्ये रुजत आहेत, असे जगभर मानले जाते पण हा एक भ्रम आहे. सर्वसामान्य जनमत बेसावध असताना जगभर फॅसिस्ट आणि प्रतिगामी प्रवृत्ती कशा फोफावत आहेत त्याचा फॅसिस्ट इतिहास व प्रवृत्तींच्या आधारे घेतलेला आढावा. इ. स. १९२२ साली तीन गरीब शेतकऱ्यांची होतकरू मुले जर्मनीला तंत्रज्ञानातले उच्च शिक्षण मिळवण्याकरिता पराकाष्ठेची धडपड करून पोहोचतात. त्यांच्यातला एक तुकाराम गणू चौधरी हा इ. स. १९२५ मध्ये तिकडून हिंदुस्थानात परत आल्यावर त्याने लिहून काढलेले हे आठवणींवजा आत्मकथन. कोणत्याही काळाचा प्रत्यक्ष दस्तऐवज म्हणून तर अशा कथनांना महत्त्व असतेच - भालचंद्र नेमाडे


विलोकन अरुणाच्या निमित्ताने आमचा अंदमानचा कारावास न सांगितलेली गोष्ट
लेखक : विलास खोले लेखक : सुनीता कुलकर्णी, सीमा केतकर लेखक : विजय कुमार सिन्हा, अनुवाद : रुपेश पाटकर लेखक : सिद्धार्थ देवधेकर
पाने : २९२ किंमत : रु. २९५ पाने : ६० किंमत : रु. ५० पाने : १६४ किंमत : रु. २२० पाने : १६० किंमत : रु. २००
विलोकन’ हे मराठी साहित्यविश्वातील वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचे, लेखनप्रवाहांचे व लेखनप्रवृत्तींचे आकलन आहे. तटस्थ दृष्टिकोनातून साहित्याचा वेध घेताना जिज्ञासू लेखकाच्या नजरेने न्याहाळलेले वाङ्मयीन रूप आणि रंग या पुस्तकात प्रत्ययपूर्ण शब्दांत मूर्त झाले आहेत. ‘विलोकन’ या ग्रंथाचे लेखक विलास खोले हे मराठी साहित्याचे जाणकार अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. ‘अरुणाच्या निमित्ताने...’ या पुस्तकामध्ये चंपामावशीसारख्या आयाबाईपासून ते डीन सुपेंपर्यंत सगळ्यांनी अरुणा शानबागची काळजी कशी घेतली याचं दर्शन घडतं. त्याचप्रमाणे अतिशय बिकट परिस्थितीत तन्मयतेने, निष्ठेने काम करणाऱ्या परिचारिकांचे प्रश्न व समस्या यांची मांडणी करण्यात आली आहे. भगतसिंगांचे जवळचे सहकारी असलेल्या विजय कुमार सिन्हांच्या लेखणीतून हे पुस्तक साकार झाले आहे. सिन्हांच्या समवेत तीनशेहून अधिक क्रांतिकारकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. सेल्युलर जेलच्या कोठड्यांतून क्रांतिकारकांनी जो संघर्ष चालू ठेवला त्याची ही देदीप्यमान कहानी. बाबुराव बागूल यांच्या ‘विद्रोह’ या कथेच्या पाश्र्वभूमीवर सिद्धार्थ देवधेकर यांच्या कथा ठेवून पाहिल्यास त्यांचं वेगळेपण निराळ्या पद्धतीने सिद्ध होतं. बाबुरावांचा नायक हा शंभरातला एक ठरू शकणारा विद्रोहाचा मूर्तिमंत पुतळा होता तर देवधेकरांच्या कथांचे नायक हे शंभरातल्या नव्याण्णवांप्रमाणे अगतिक, हतबल आणि बंडाचा विचार स्वप्नातही करू न शकणारे सर्वसामान्य आहेत.


मिरवणूक आत्महत्या पडलेली असते आंबेडकर भवन मानवतेचा अमरदीप
लेखक : उत्तम कांबळे लेखक : वजेश सोलंकी संपादक : कों. राम बाहेती / केशव वाघमारे लेखक : माधव पोतदार
पाने : १२० किंमत : रु. १५० पाने : १६ किंमत : रु. १० पाने : ५६ किंमत : रु. २५ पाने : २१२ किंमत : रु. २००